वरूण धवन-श्रद्धा कपूर सोबत ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये दिसणार आहे. यासगळ्यामध्ये वरुण धवन त्याच्या लग्नाचा चर्चांना घेऊन प्रकाशझोतात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र दोघांनी लग्नाच्या तारखेबाबत मौन सोडले नाही. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार हे कपल 2020 मध्ये लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे.
रिपोर्टनुसार वरूण आणि नताशा एप्रिल किंवा मे महिन्याच्या शेवटपर्यंत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुणने एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे सांगितले आहे. मात्र रिपोर्टनुसार कपल लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचे समजतेय. वरूणचा आगामी सिनेमा 'कुली नंबर 1' मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे लग्नाची तारीख बदलण्याची शक्यता आहे.