Join us

Varun Dhawan : बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? वरूण धवन स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 12:11 PM

Varun Dhawan : एका इव्हेंटमध्ये वरूण एका ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलला. इतकंच नाही तर बायकॉट ट्रेंडवरही त्याने आपलं मत मांडलं. 

अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan ) कायम चर्चेत असतो. सध्या चर्चा आहे ती त्याच्या 'सिटाडेल' या वेबसीरिजची. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा आहे. या सीरिजमध्ये वरूण साऊथ ब्युटी सामंथा रूथ प्रभुसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  नुकताच एका इव्हेंटमध्ये वरूण एका ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलला. इतकंच नाही तर बायकॉट ट्रेंडवरही त्याने आपलं मत मांडलं. अभिनेत्री आलिया भट आणि वरुण धवन यांनी झी सिने अवॉर्ड्स २०२३ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी वरूण धवनला ‘पठाण’ वादावर प्रश्न विचारण्यात आला. 

काय म्हणाला वरूण?“माझ्या मते, कोणत्याही प्रकारच्या बायकॉट ट्रेंड लक्ष देण्याची गरजच नाही. आम्ही बायकॉट ट्रेंडला इतकं महत्त्व द्यायचंच का? प्रेक्षकांना मनोरंजन हवं आहे आणि त्यांना ज्या प्रकारचं मनोरंजन हवं आहे, ते त्यांना मिळायला हवं. ‘पठाण’ला मिळत असलेलं यश हेच सिद्ध करतं. ‘पठाण’ने लोकांना हवं ते मनोरंजन दिल आणि हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतलस. ‘पठाण’ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तर बॉलिवूडसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? मी तर म्हणेल आपण यावर फार चर्चाही करायला नको,” असं वरूण म्हणाला.

 तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधी ‘बेशरम रंग’ या गाण्याला प्रचंड विरोध झाला होता. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला होता. अनेक हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावर या गाण्याच्या विरोधात बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बायकॉट गँगला जोरदार प्रत्युत्तर मिळालं. बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ छप्परफाड कमाई करत आहे.  पहिल्याच दिवशी ‘पठाण’ने ५७ कोटींचा गल्ला जमवला. तर मंगळवार पर्यंत या चित्रपटाने ३२८.२५ कोटी एवढी कमाई केली.

टॅग्स :वरूण धवनपठाण सिनेमाबॉलिवूड