Join us

वरूण धवनने गुपचूप उरकला साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 11:27 AM

खरे तर वरूण नताशाबद्दल बोलणे टाळतो. पण नताशा माझी गर्लफ्रेन्ड नसून होणारी पत्नी आहे, हे अनेकदा त्याने कबुल केले आहे.

ठळक मुद्दे वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वरूण आणि त्याची गर्लफे्रन्ड नताशा दलाल यांचे रोमॅन्टिक नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाहीत. खरे तर वरूण नताशाबद्दल बोलणे टाळतो. पण नताशा माझी गर्लफ्रेन्ड नसून होणारी पत्नी आहे, हे अनेकदा त्याने कबुल केले आहे. आता एक ताजी खबर आहे. त्यानुसार, वरूण व नताशा या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचे कळतेय.

देसी मार्टिनी या एंटरटेनमेंट वेबसाईटनुसार, वरूण व नताशा यांनी गतवर्षीच म्हणजे 2018 मध्ये गुपचूप साखरपुडा केला. दोघांनी कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत हा साखरपुडा केला. हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने केवळ वरूण व नताशाचे कुटुंब आणि 1-2 अतिशय जवळचे मित्र एवढेच लोक या सोहळ्याला उपस्थित होते. तूर्तास या बातमीवर वरूण वा त्याच्या कुटुंबाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

अलीकडे हे कपल येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी आली होती. या डेस्टिनेशन वेडिंगची तयारी सुरु झाल्याचेही या बातमीत म्हटले गेले होते. अर्थात वरूणने या बातम्या नाकारल्या होत्या. वरूणचे वडील डेव्हिड धवन यांनीही हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते.

 वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या पार्टीतही हे दोघे दिसले होते.वरूण सध्या ‘स्ट्रिट डान्सर 3डी’ या सिनेमात बिझी आहे. यासोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकचे शूटींगही तो करतोय.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल