Join us

वरुण धवनचा हिंदूजा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल, कोणत्याही क्षणी नताशा देणार गुडन्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 16:44 IST

सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या बाबाचा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) लवकरच बाबा होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने नताशा दलालचा फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली होती. आता नताशा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल झाली आहे. तर वरुण धवन रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. याचा अर्थ कोणत्याही क्षणी हे कपल गुडन्यूज देण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या बाबाचा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होतोय.

आज सोमवारी दुपारी वरुण धवनला हिंदुजा रुग्णालयाबाहेर निघताना पाहिले गेले. त्याच्या हातात एक बॅग होती. रुग्णालयाबाहेर येताच तो कारमध्ये बसला आणि तिथून निघाला. तर पत्नी नताशा सध्या रुग्णालयात दाखल झाली आहे. तिला प्रसुती वेदना सुरु झाले असल्याची चर्चा आहे म्हणूनच तिला अॅडमिट करण्यात आले आहे. याचा अर्थ कोणत्याही क्षणी वरुण धवनच्या घरी पाळणा हलू शकतो. सध्या धवन कुटुंब चिमुकल्या पाहुण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. पापाराझींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक कपल्सने गुडन्यूज दिली. काही दिवसांपूर्वीच यामी गौतमने मुलाला जन्म दिला. तर रिचा चड्डाही येत्या काही महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. शिवाय सर्वांची लाडकी जोडी रणवीर सिंह-दीपिका पदुकोणही या वर्षी सप्टेंबर महिन्यात आई बाबा होणार आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

वरुण धवन आगामी अॅक्शन थ्रिलर 'बेबी जॉन' मध्ये दिसणार आहे. याशिवाय करण जोहरच्या आगामी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाची घोषणा झाली आहे ज्यामध्ये वरुणसोबत जान्हवी कपूर झळकणार आहे. तसंच प्राईम व्हिडिओ सीरिज 'सिटाडेल'च्या भारतीय रिमेकमध्ये तो समंथा रुथ प्रभू सोबत दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडनताशा दलालप्रेग्नंसीहॉस्पिटलमुंबई