Join us

गणपती बाप्पा मोरया! वरुण धवन लालबागच्या चरणी नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:00 IST

अभिनेता वरुण धवनने चित्रपट निर्माते मुराद खेतानी यांच्यासह नुकतंच लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं.

देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत लाल बागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा याठिकाणी जाऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. अभिनेता वरुण धवनने  चित्रपट निर्माते मुराद खेतानी यांच्यासह नुकतंच लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. वरुणने फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

वरुणने फोटो सोशल मिडीयावर चांगले व्हायरल झालेत. या फोटोत वरुणने पिवळा कुर्ता परिधान केलेला दिसून येतोय. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. 

वरुण धवन शेवटचा नितेश तिवारी दिग्दर्शित बवाल चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो एटली कुमार दिग्दर्शित 'व्हिडी 18' या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी रिलीज होणार आहे. एटली आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

वरूणने करण जोहर प्रोडक्शनच्या ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. वरुणने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. पण त्याला अभिनयात अधिक रस असल्याने तो बॉलिवूडकडे वळला.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडगणेशोत्सव