Join us

वरूण धवन नताशासोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 7:09 AM

बॉलिवूडला सध्या लग्नाचे वेध लागले आहेत असे म्हटलं तर वागवे ठरणार नाही. विरुष्काच्या लग्नानंतर एप्रिलमध्ये सोनम कपूर डेस्टिनेशन वेडिंग ...

बॉलिवूडला सध्या लग्नाचे वेध लागले आहेत असे म्हटलं तर वागवे ठरणार नाही. विरुष्काच्या लग्नानंतर एप्रिलमध्ये सोनम कपूर डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे कळेतय. तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या घरी लग्नाची तयारी जारोत सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा मोस्ट बॉचलर वरुण धवनच्या लग्नाची चर्चा आहे.  आता तर त्यांने आई-वडिलांचे घर सोडून मुंबईत स्वत:चा आशियाना खरेदी केला आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चेला आणखीन उधाणं आले आहे. मात्र जरा थांबा वरुन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया भट्टशी वाढलेल्या जवळीकतेमुळे नताशा आणि वरुणाच्या नात्यात काहीसा दुरावा आला आहे. तसेच वरूणच्या बिझी शेड्यूलमुळे तो नताशाला वेळ देऊ शकत नाहीयं. त्यामुळे या नव्या घरात तो नताशा सोबत राहणार आहे. त्यामुळे लिव्ह-इनमध्ये गर्लफ्रेंडसोबत राहण्यासाठी वरूणने वडिल डेव्हिड धवन यांचे घर सोडल्याचे समजते आहे. नताशा सोबतच वरुणचे नातं तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी पासूनच आहे. 'जुडवा 2'च्या स्क्रिनिंगच्या वेळी नाताशा उपस्थिती होती. अनेक पार्टीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी नताशा वरुण सोबत नेहमी दिसते. मिळालेल्या माहितीनुसार नताशाला लवकरात लवकर वरुण सोबत लग्न गाठीत अडकायचे आहे. सध्या वरुण त्याचा आगामी चित्रपट 'सुई धागा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो अनुष्का शर्मासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल. नुकताच त्यांनी  शूजित सरकारच्या ‘अक्टूबर’ चित्रपटाची शूटिंग केली आहे. ‘अक्टूबर’ या  चित्रपटाचीदेखील इतर चित्रपटांप्रमाणे वेगळी आणि हटके कथा आहे. वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा शुजीत यांना सुचली होती. वरुण धवनभोवती या चित्रपटाची कथा फिरते. तसेच हा हॉलिवूडचा चित्रपट 'हर'वर आधारित असल्याचे देखील बोलले जातेय. यानंतर वरुण 'किक २'मध्ये सलमानसोबत दिसणार आहे. साजिद नाडीयादवालाने 'किक २' बद्दल दोघांशी बोलणी सुद्धा सुरु केली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.