Join us

देशमुखांच्या सूनबाईंनी सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाली-आई तुम्ही माझ्यावर ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:03 IST

महाराष्ट्राची सून म्हणून जिनिलिया देशमुखने एक वेगळी ओळख निर्माण आहे. रितेशच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिने एकखास पोस्ट शेअर केली आहे.

  रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे फक्त बॉलिवूडच नाही तर सोशल मीडियावरही सर्वांचे लाडके कपल आहे. ते त्यांच्या गोंडस केमिस्ट्री आणि मजेदार विनोदाने त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि रिल्सला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ते दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. दरम्यान जिनिलिया देशमुखने तिच्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.  जिनिलिया सासूबाईंच्या खूप जवळ आहे अनेकवेळा दोघींमधलं बॉन्डिंग दिसून येत.  रितेशच्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिनिलियाने पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत. जिनिलियाने सोशल मीडियावर सासूबाईंचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत रितेश आणि जिनिलिया यांची दोन मुलं देखील आहेत.  

जिनिलियाची पोस्ट ''प्रिय आई, एका आधुनिक जगातील स्त्री कशी विचार करते, ती कशी दिसते हे मला शिकवल्याबद्दल खूप आभारी आहे. माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे प्रेम केल्याबद्दल धन्यवाद, माझं मराठी रोज थोडं थोडं सुधारल्याबद्दल थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी आई झाल्याबद्दल खूप आभार. हॅप्पी बर्थ डे आई. तुमच्यासारखं दुसरं कुणी असूच शकत नाही.''

जिनिलियाच्या पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. जिनिलिया प्रमाणेच रितेश देशमुखनेही आपल्या आईसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जिनिलियाची जोडी वेड सिनेमात एकत्र दिसली होती.  

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख