Join us

वीर सावरकर: रणदीप हुड्डाने 4 महिन्यात घटवलं 26 किलो वजन ; फॉलो केला 'हा' डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 1:26 PM

Randeep hooda: रणदीपने केलेला डाएट प्लॅन कोणालाही फॉलो करण शक्य नाही एवढा कठीण होता.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याची मुख्य असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे.  अलिकडेच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर हा सिनेमा ट्रेंड होऊ लागला. या सिनेमात रणदीपच्या लूकचं नेटकरी कौतुक करत आहेत. मात्र, हा लूक मिळवण्यासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली आहे.

प्रदर्शित झालेला टीझर पाहिल्यानंतर रणदीप हुबेहूब विनायक दामोदर सावकर यांच्यासारखा दिसतोय. त्यामुळे नेटकरी एकदम भारावून गेले आहेत. परंतु, या भूमिकेसाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली असून त्याने ४ महिन्यात तब्बल २६ किलो वजन कमी केलं आहे. एका मुलाखतीत  त्याने त्याचा डाएट प्लॅन सांगितला आहे.

असा होता रणदीपचा डाएट प्लॅन

या सिनेमासाठी रणदीपला २६ किलो वजन कमी करायचं होतं. हे वजन अवघ्या ४ महिन्यांमध्ये कमी करायचं असल्यामुळे त्याच्यासमोर मोठं आव्हान होतं. परंतु, अथक मेहनत घेऊन रणदीपने ते शक्य करुन दाखवलं. याविषयी चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी रणदीपच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं.

रणदीप जेव्हा मला या चित्रपटाच्या निमित्ताने भेटला त्यावेळी त्याचं वजन ८६ किलो होतं. परंतु, या भूमिकेसाठी त्याला वजन कमी करणं गरजेचं होतं. या सिनेमाचं शुटिंग संपेपर्यंत रणदीप केवळ ४ महिने १ खजूर आणि एक ग्लास दूध एवढाच आहार घेत होता. त्यामुळे अवघ्या ४ महिन्यात त्याने २६ किलो वजन कमी केलं. तसंच या भूमिकेसाठी त्याने त्याचे केसही कापले.

दरम्यान, मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या रणदीपने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यापूर्वी त्याने सरबजीत या सिनेमासाठी वजन कमी केलं होतं. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन हिने स्क्रीन शेअर केली होती. 

टॅग्स :रणदीप हुडासिनेमाबॉलिवूडसेलिब्रिटी