अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा
By अमित इंगोले | Published: October 13, 2020 02:33 PM2020-10-13T14:33:22+5:302020-10-13T14:38:49+5:30
अजय देवगनचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यात साजिद खानने अजयबाबतचा अनेकांना माहीत नसलेला एक किस्सा सांगितलाय.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचे वडील वीरू देवगन हे इंडस्ट्रीतील मोठे अॅक्शन दिग्दर्शक होते. स्टंट आणि अॅक्शन सीक्वेंस दिग्दर्शन करणारे विरू देवगन यांनी 'हिंदुस्थान की कसम'सारख्या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं. यात अजय देवगन हा मुख्य भूमिकेत होता. सोबतच अमिताभ बच्चन यांचीही मुख्य भूमिका होती. दरम्यान अजय देवगनचा एका जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यात साजिद खानने अजयबाबतचा अनेकांना माहीत नसलेला एक किस्सा सांगितलाय.
या व्हिडीओत दिग्दर्शक साजिद खान अजय देवगनसोबत झालेला एक किस्सा सांगत आहे. साजिद खानने सांगितले की, 'अजयकडे पांढऱ्या रंगाची जीप होती. ज्यात आम्ही सगळे फिरत होतो. हॉलिडे हॉटेलजवळ एक निमुळती गल्ली होती. ज्यातून पंतगीमागे धावणारा एक मुलगा अचानक समोर आला. जीप फूल स्पीडमध्ये होती, आम्ही जोरात ब्रेक दाबला. सुदैवाने त्या मुलाला काही लागलं नाही. तो घाबरला होता आणि रडू लागला होता. माहीत नाही तिथे अचानक हजारो लोक जमा झाले. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो की, यात अजयची काहीच चूक नाही आणि तो लहान मुलगा ठीक आहे'.
That’s another major tribute for #VeeruDevgn ji @ajaydevgn
— Joginder Tuteja (@Tutejajoginder) May 28, 2019
What a story, when Ajay Devgn was attacked by a crowd of 1000 and his dad took them all heads on!!! pic.twitter.com/YMps1OkgQN
साजिद खानने पुढे सांगितले की, 'पण ते लोक भडकले होते. ते बोलू लागले की, बाहेर निघा. तुम्ही सगळे श्रीमंत लोक वेगाने गाड्या चालवता. नंतर काही समजलं नाही की काय झालं. १० मिनिटांनी या घटनेची माहिती अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांना मिळाली. ते लगेच १५० ते २५० फायटर्स घेऊन स्पॉटवर पोहोचले. हा नजारा एखाद्या सिनेमाच्या सीनसारखाच होता'.