Join us

पहिल्याच शूटमध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला घ्याव्या लागल्या होत्या 'गर्भनिरोधक' गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:26 IST

पहिल्याच शूटमध्ये या अभिनेत्रीला 'गर्भनिरोधक' गोळ्या घ्यावा लागल्यामुळे वडिलांनी दिली होती अशी रिएक्शन 

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री राधिका मदनने पटाखा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शेवटची ती अंग्रेजी मीडियम सिनेमात झळकली. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच तिने एक खुलासा केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.मुंबई मिररला राधिकाने हैराण करणारा खुलासा केला आहे. या मुलाखतीत राधिकाने सांगितले की, करियरच्या पहिल्याच शूटमध्ये तिला गर्भनिरोधक गोळ्या खाव्या लागल्या होत्या. तिने सांगितले की, 'मला पहिल्या शॉटमध्ये गर्भनिरोधक गोळी खरेदी करावी लागली. मजेची गोष्ट अशी होती की, माझे पालक मला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीहून आले होते. अशा परिस्थितीत माझ्या वडिलांना फार विचित्र वाटले.'

तिने पुढे सांगितले की, माझ्या वडिलांना ही चिंता सतावत होती की आता जे त्यांना माझ्या शूटबद्दल विचारतील, त्यांना काय सांगायचं. मला वाटलं होतं की शूटिंगनंतर सर्व माझ्या पहिल्या शॉटचं कौतूक करतील. पण तसं काहीच झाले नाही.

राधिकाने सांगितले की, माझे स्वप्न होते की माझे पदार्पण बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड लेवलवर व्हावे. पण मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटानंतर इंडस्ट्रीत माझ्याकडे इतरांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. याचे श्रेय या चित्रपटाचे दिग्दर्शन विसन सर आणि पटाखाचे दिग्दर्शक विशाल सरांना जाते.

टॅग्स :राधिका मदन