Join us  

​ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार निमोनियाने आजारी, डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 5:15 AM

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. प्रकृती बिघडताच काल रात्री त्यांना रूग्णालयात भरती करण्यात ...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. प्रकृती बिघडताच काल रात्री त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. अर्थात चिंतेचे कारण नसून तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिलीप कुमार यांना सौम्य निमोनिया झाला आहे. या कारणाने त्यांना डायलिसीसची गरज भासली. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दिलीप कुमार यांच्या अधिकृत twitter हँडलवरून त्यांचे खास मित्र फैजल फारूख यांनी tweetद्वारे त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. ‘साहेबांना सौम्य निमोनियाने ग्रासले आहे. त्यांना घरीच विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अल्लाहच्या कृपेने अन्य सगळ्या गोष्टी सामान्य आहेत. साहेबांची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांचासोबत असू द्या,’ असे त्यांनी लिहिले आहे.ALSO READ : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिलेत काय?दिलीप कुमार हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यावेळी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. दिलीप कुमार लवकर बरे होवोत, अशी कामना आम्ही करतो.ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार १९९८ मध्ये आलेल्या ‘किला’ या चित्रपटात अखेरचे अभिनय करताना दिसले.  त्यांनी १९४४ मध्ये आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तब्बल सहा दशक त्यांनी बॉलिवूडवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. आपल्या विशिष्ट अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. इंडस्ट्रीमध्ये  त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. आतापर्यंत त्यांना आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांना भारतीय चित्रपट सुष्टीचा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.