Join us

अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन, मुलाच्या निधनानंतर दोन महिन्यातच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:06 AM

Veteran actor Shiv Kumar Subramaniam passed away : 'टू स्टेट' या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने ऑनस्क्रीन भूमिका साकारणारे शिव सुब्रमण्यम यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झालं

Veteran actor Shiv Kumar Subramaniam Passed Away :  ‘2 स्टेट’ या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि पटकथा लेखक शिवकुमार सुब्रमण्यम  (Shiv Kumar Subramaniam ) यांचे काल रात्री उशीरा निधन झालं आहे. मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तथापि शिवकुमार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.   

निर्माता, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी शिवकुमार यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.  दोन महिन्यांपूर्वीच शिवकुमार यांच्या मुलाचं निधन झालं होतं. लेकाच्या मृत्यूनंतर दोनच महिन्यांनी शिवकुमार यांनीही जगाचा निरोप घेतला.

2 महिन्यांआधी काळानं हिरावला मुलगाफिल्ममेकर बीना सरवर यांनी शिवकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दोन महिन्यांआधी शिवकुमार यांचा मुलगा जहान याचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला होता, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी लिहिलं, ‘खूप दु:खद बातमी. मुलगा जहानच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा जहान याला ब्रेन ट्युमर झाला होता. 16 व्या वाढदिवसापूर्वी त्याचे निधन झालं.’

 

शिवकुमार यांनी या चित्रपटांत साकारल्या भूमिकाशिवकुमार सुब्रमण्यम काही दिवसांपूर्वी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या सिनेमात दिसले होते. या सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती. ‘2 स्टेट्स’ शिवाय  तीन पत्ती,  प्रहार आणि राणी मुखर्जी स्टारर  हिचकी या चित्रपटामध्येही ते झळकले होते.  विधू विनोद चोप्राच्या ‘परिंदा’ आणि सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारों ख्वैशीं ऐसी’  या चित्रपटाची पटकथा शिवकुमार यांनी लिहिली होती. सा दोन्ही चित्रपटासाठी त्यांनी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला होता. ‘मुक्ती बंधन’  या टीव्ही शोमध्येही त्यांनी काम केलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी