६० च्या दशकातही बोल्ड सीन द्यायला घाबरली नाही, अशी अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीने आपला एक काळ गाजवला. त्याकाळातील सुपरस्टार असे तिला म्हणतात येईल. पहिल्याच चित्रपटात तिला राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या पहिल्याच चित्रपटाने निम्मीला एका रात्रीत स्टार बनवले. बघता बघता ५० ते ६० च्या दशकात निम्मी शिखरावर पोहोचली. त्याकाळात प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक निम्मीसोबत काम करण्यास उत्सूक होता. दिलीप कुमारपासून राज कपूर, अशोक कुमार, धर्मेन्द्र सारखे सुपरस्टारही निम्मीसोबत काम करण्यासाठी उत्सूक असत. राज कपूर तर एका चित्रपटात निम्मीचं हिरोईन हवी म्हणून अडून बसले होते. पण याच काळात निम्मीन एक चूक केली आणि तिच्या करिअरचा ग्राफ असा काही खाली आला की, तो पुन्हा वर गेलाचं नाही.
१९६३ मध्ये निम्मीला ‘मेरे महबूब’ चित्रपट आॅफर केला गेला. चित्रपटाचे दिग्दर्शक हरनाम सिंह रवैल या चित्रपटात निम्मीला लीड हिरोईल आणि बीना रॉय यांना राजेन्द्र कुमारच्या बहिणीच्या भूमिकेत घेऊ इच्छित होते. पण निम्मीच्या मते, या चित्रपटात हिरोईनपेक्षा बहीणीची भूमिका अधिक प्रभावी होती. त्यामुळे तिने हीच भूमिका करण्याचा हट्ट धरून ठेवला. निम्मीच्या हट्टासमोर दिग्दर्शकाची काय चालणार? अखेर लीड हिरोईन म्हणून साधनाला साईन केले गेले आणि राजेन्द्र कुमारच्या बहीणीच्या भूमिकेत निम्मी फायनल झाली. चित्रपट रिलीज झाला अन् निम्मीला जोरदार धक्का बसला. होय, कारण निम्मीचा अंदाज खोटा ठरला़ होता. चित्रपट हिट झाला पण या चित्रपटाने साधनाला टॉपची हिरोईन बनवले. याऊलट निम्मीच्या करिअरला मात्र उतरती कळा लागली.
‘मेरे महबूब’मध्ये बहिणीची भूमिका साकारण्याचा निर्णय निम्मीला महाग पडला. या चित्रपटानंतर निर्माता-दिग्दर्शकांनी निम्मीला ‘वो कौन थी’ आणि ‘पूजा के फूल’ सारख्या चित्रपटात रिप्लेस केले़ गेले. ‘पूजा के फूल’मध्ये निम्मीला एका आंधळ्या महिलेची भूमिका दिली गेली आणि माला सिन्हाला लीड रोल दिला गेला. नाही म्हणायला ‘आकाशदीप’मध्ये तिने लीड हिरो अशोक कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली. पण या चित्रपटातही धर्मेन्द्र आणि नंदा यांच्यावरचं संपूर्ण फोकस राहिला. ‘मेरे महबूब’मध्ये बहिणीची भूमिका निवडल्याचा पश्चाताप निम्मीला झाला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. १९९३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा पश्चाताप बोलून दाखवला होता. मी अनेक चांगल्या भूमिका साकारू शकत होते. पण मला त्या मिळाल्याच नाही. माझी इच्छा आजही अपूर्ण आहे, असे ती म्हणाली होती.निम्मी आज ८५ वर्षांची आहे. तिचे खरे नाव नवाब बानू आहे. दीर्घकाळापासून ती एकांतवासात जीवन जगतेय.