Join us

दिग्गज बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:36 AM

लोकप्रिय बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

ठळक मुद्देगतवर्षी चिन्मय रॉय त्यांच्या अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून पडले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

लोकप्रिय बंगाली अभिनेते चिन्मय रॉय यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. रविवारी रात्री १०.२० च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला.चिन्मय रॉय यांनी बंगाली रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. १९६६ मध्ये तपन सिन्हा दिग्दर्शित ‘गालपो होलियो सोती’ या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. १९४० मध्ये कुमिला (सध्या बांगलादेशात) येथे चिन्मय यांना जन्म झाला. बंगाली चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकार म्हणून ते लोकप्रिय होते.

चिन्मय यांच्या पत्नी जुई बॅनर्जी याही अभिनेत्री आहेत. गतवर्षी चिन्मय रॉय त्यांच्या अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून पडले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली होती. चिन्मय रॉय यांनी चारमूर्ति, बासंता बिलाप, नानी गोपालेर बिये अशा अनेक क्लासिक चित्रपटांत अभिनय केला. सत्यजीत रे यांच्या ‘गुपी गाईने बाघा बाईने’ या क्लासिक सिनेमांतही त्यांनी काम केले.