Join us

Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 7:26 PM

Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबाने ११ ऑक्टोबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला

Masaba Gupta Satyadeep Misra Blessed With A Baby Girl: ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ( Masaba Gupta) आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा आई-बाबा झाले. मसाबाने काल म्हणजेच, ११ ऑक्टोबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला. मसाबा गुप्ता आणि पती सत्यदीप मिश्रा यांनी आपला हा आनंद आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर केला.

मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी १८ एप्रिल रोजी एक फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. ३४ वर्षीय मसाबा गुप्ताने इन्स्टाग्रामवर गरोदर महिलेचा एक क्युट इमोजी शेअर केला होता. त्यानंतर डोळ्यात हार्ट् असलेले आई आणि बाबाचे असे दोन इमोजी शेअर केले होते. शेवटी तिसऱ्या पोस्टमध्ये तिने पतीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये ती सत्यदीपच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. त्यांच्यावरती छोट्या पायांचे डिझाईन होते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, छोटी पावलं आमच्याकडे चालत येत आहेत. तुमचं खूप प्रेम, आशीर्वाद आणि केळीचे वेफर्स (फक्त प्लेन सॉल्टेड) पाठवा. #momnddad.

नुकत्याच आजी झालेल्या एव्हरग्रीन अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही त्यावेळी आनंद व्यक्त करत लिहिले होते की, आता आमच्या मुलांना मुलं होणार आहेत. यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो.

मसाबा गुप्ताचे हे दुसरं लग्न आहे. याआधी २०१५ मध्ये तिने मधु मंटेना सोबत लग्न केले होते. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षी तिने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. सत्यदीपचेही हे दुसरं लग्न आहे. याआधी तो आदिती राव हैदरीचा नवरा होता. २०१३ मध्ये ते वेगळे झाले.

 

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूड