Sharda Sinha Journey : प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha)यांच्या निधनाने संगीत जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचं जाण्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. शारदा सिन्हा यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली आहेत. त्यासोबतच बॉलिवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' चित्रपटातील एका गाण्यालाही आपला आवाज दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, १९९४ मध्ये आलेल्या 'मैंने प्यार किया'या चित्रपटातील 'कहे तोसे सजना' हे गाणं त्यांनी गायलं आहे. परंतु या गाण्यासाठी त्यांना ७६ रुपये इतकं मानधन मिळालं होतं. त्यावेळी हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. आजही चाहत्यांच्या कानावर या गाण्याचे स्वर पडताच ते भावुक होतात. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 'मैंने प्यार किया' चित्रपटाने ४५ कोटींचा बिझनेस केला होता. या गायिकेने आपल्या गाण्यांमधून बिहारमधील लोकसंस्कृतीचं दर्शन घडवलं.
शारदा सिन्हा 'बिहार कोकिला' म्हणून ओळखल्या जातात. 'कहे तोसे सजना' या गाण्याशिवाय त्यांनी बॉलिवूडमधील 'हम आपके हैं कौन' मधील 'बाबुल' तसेच 'गॅंग्स ऑफ वासेपूर' मधील तार 'बिजली पतले हमारे पिया' या गाण्यांना आपला आवाज दिला. शिवाय त्यांनी टी-सीरीज, एचएमव्हीसह नऊ अल्बममध्ये ६२ छठ गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी भोजपुरी, मैथिली या भाषांमध्ये गाणी गायली आहेत.संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल १९९१ मध्ये 'पद्मश्री' आणि २०१८ मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.