Join us

या अभिनेत्रीचे ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले निधन, 500 पेक्षाही अधिक सिनेमात केले काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 18:15 IST

त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.  

गुरुवारी तेलुगू अभिनेत्री गीतांजली रामकृष्ण यांचं निधन झाले आहे. 72 वर्षांच्या गीतांजली यांना ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आहे ज्याठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली.  

साऊथच्या सिनेसृष्टीत गीतांजली यांचं मोठ नाव होते. त्यांनी 500 पेक्षा अधिक तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मल्याळम सिनेमात काम केले होते. गेल्या सहा दशकापासून त्या अभिनय करत होत्या.  गीतांजली यांनी 1961 साली सीनियर एनटीआर यांच्या सीतारामा कल्याणम या तेलुगू सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन  सीनियर एनटीआर यांनी केले होते. 

गीतांजली यांचा जन्म 1947 साली आंध्रप्रदेशमध्ये झाला होता. त्याचा विवाह अभिनेता रामकृष्ण यांच्यासोबत झाला होता. गीतांजली यांच्या पतीचे 2001मध्ये निधन झाले होते. लग्नाच्या आधी दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले होते. गीतांजली यांनी बॉलिवूडदेखील अनेक सिनेमात काम केले आहे. ज्यात पेईंग गेस्ट, पारसमणी, दो कलियां, बलराम श्री कृष्णा आणि बंधु यासारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.    

टॅग्स :मृत्यू