बॉलिवूडमधील साठ व सत्तरच्या दशकातील अभिनेत्री नाजिमा चित्रपटातील सपोर्टिंग भूमिकांसाठी ओळखल्या जातात. मात्र त्यांचं नाव व रेकॉर्डबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. नाजिमा यांनी सर्वात जास्त चित्रपटात रेप सीन दिले आहेत. त्यांना बेइमान चित्रपटासाठी १९७२ साली फिल्मफेयर पुरस्कारामध्ये बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीसाठी नामांकन मिळालं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाजिमा यांचं निधन वयाच्या २७व्या वर्षी झालं. मात्र अधिकृतरित्या त्यांच्या निधनाबद्दल काही समजू शकलेलं नाही.
नाजिमा यांच्या इनोसंट लुकमुळे त्यांना अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळायची. त्या काळात त्या बॉलिवूडची बहिण या नावानं प्रसिद्ध झाल्या होत्या. नाजिमा यांनी एकाच चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. या सिनेमाचं नाव 'दयार-ए-मदीना' असून १९७५ साली प्रदर्शित झाला होता. साठ ते सत्तरच्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये बऱ्याचदा अभिनेता व अभिनेत्रीच्या छोट्या बहिणी बलात्कारास बळी पडल्याचं दाखवलं जायचं. त्यात लीडच्या कलाकारांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या नाजिमा यांना सर्वात जास्त रेप सीन करावे लागत होते.
नाजिमा यांना दिग्दर्शक कधीच मुख्य भूमिका देत नव्हते. त्यामुळे त्या छोटी बहिणीची सपोर्टिंग भूमिका करण्यास तयार व्हायच्या. सिनेप्लॉटमध्ये प्रकाशित झालेल्या १९६८ सालच्या मुलाखतीत नाजिमा यांनी म्हटलं होतं की, मला स्वतःला माहित नाही की मला दिग्दर्शक मुख्य भूमिका का द्यायचे नाहीत. मला मुख्य भूमिका मिळेल, अशी आशा करत रहायचे. मला या गोष्टीचं अजिबात दुःख नाही की मी करियरमध्ये निवडक चित्रपटात काम केलं आहे. उलट मी साकारलेल्या भूमिकांतून मी आनंदी आहे. मला माहित आहे काही न करण्यापेक्षा काही तरी करणं चांगलं आहे.
नाजिमा यांनी त्यांच्या करियरची सुरूवात बालकलाकार बेबी चांद या नावानं केली होती. देवदास, गंगा जमुना आणि हम पंछी एक डाल यासारख्या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.
त्यांनी शेवटचं १९७५ साली प्रदर्शित झालेल्या रंगा खुश या चित्रपटात काम केलं होतं. जवळपास दहा वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी तीस चित्रपटात काम केलं होतं.