गतवर्षी डिसेंबरमध्ये प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. दोघांनी जोधपूरच्या उमेद भवनमध्ये लग्न केले. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. सध्या दोघांचे अमेरिका आणि लंडनमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याच दरम्यान दोघांसंबधीत आणखी एक बातमी समोर येतेय.
VH1 Supersonic 2019 फेस्टिव्हल यावर्षी 16-17 फेब्रुवारीला होणार आहे. ज्यात जेडन स्मिथ परफॉर्म करणार आहे. निक जोनाससुद्धा विल स्मिथच्या रॅम्पर मुलाचा मित्र आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की जेडनच्या भारतातील पहिल्या परफॉर्मेन्सच्या वेळी निक जोनाससुद्धा त्याच्यासोबत असेल. निक जर भारतात असेल तर प्रियांका साहजिकच त्याच्यासोबत असणार. तीसुद्धा त्याच्या परफॉर्मेन्सचा हिस्सा बनू शकते.
प्रियांकाच्या कामाबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.