गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत येत असलेली विकी कौशल (Vicky kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) ही जोडी आज अखेर लग्नबंधनात बांधली जाणार आहे. राजस्थानमधील माधोपूर येथे मोठ्या राजेशाही थाटात त्यांचा लग्नसोहळा होणार आहे. या लग्नापूर्वी ८ डिसेंबरला विकी-कतरिनाचा संगीत सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये कतरिनाने विकी समोर एक अट ठेवली होती. ती अट विकीला सर्वांसमक्ष मान्य करावी लागली.
सूत्रांच्या माहितीनुसार, विकी-कतरिनाच्या संगीत सोहळ्याची जबाबदारी DJ Chetas वर होती. त्यामुळे या संगीत सोहळ्याची शान वाढवण्यासाठी DJ Chetas ने कतरिनाच्या काही गाण्यांची लिस्ट तयार केली होती. विशेष म्हणजे कतरिनाचं तुफान गाजलेलं 'चिकनी चमेली' या गाण्याने या संगीत सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर 'कमली रही' हे गाणं सुरु झालं. या गाण्यावर कतरिनाने तिच्या बहिणीसोबत डान्स केला. मात्र, या संगीत सोहळ्यात कतरिनाने मज्जा करत असताना विकीला मात्र संकटात टाकलं.
'चिकनी चमेली'वर कतरिना तिच्या पाहुण्यांसोबत नाचत असतांना विकीदेखील तिला साथ द्यायला गेला. परंतु, स्टेजवर गेल्यानंतर कतरिनाने त्याच्यासमोर एक विचित्र मागणी केली. ज्यामुळे त्याला सगळ्यांसमोर ती मागणी पूर्ण करावी लागली.
विकी स्टेजवर डान्स करत असतांना कतरिनाने त्याला गाणं म्हणायचा आग्रह केला. विशेष म्हणजे विकीनेदेखील थोडे आढेवेढे घेत तेरी ओर हे गाणं म्हटलं. त्याच्या या गाण्यावर कतरिना लाजेने लालबुंद झाली. मात्र, दुसरीकडे विकी आता लग्नापूर्वीच कतरिनाच्या तालावर नाचू लागलाय. अशी प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटू लागली.
दरम्यान, विकी- कतरिनाच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अंगद बेदी आणि नेहा धुपिया राजस्थानमध्ये पोहोचले असून येथील काही फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.