बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिना याच महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे समजते आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन त्यांच्या लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी एक स्पेशल आणि सीक्रेट नियम बनवले आहेत. असे सांगितले जात आहे की, हे नियम लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांसाठी आणि त्याच्या तब्येतीसाठी गरजेचे असणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे थोडे नर्व्हस आहे, कारण हे जोडपे काही दिवसांपासून शाही विवाहसोहळ्याची योजना बनवत आहेत. अशात आता वर-वधू या दोघांच्या टीमला काळजी घ्यायला सांगितली आहे. इतकेच नाही तर त्या दोघांनी सर्व गोष्टींची काळजी आणि सतर्कता बाळगण्यासाठी एक विशेष टीम बनवली आहे.
लग्नाच्या ठिकाणी अशी घेणार काळजी
असे सांगितले जात आहे की, प्राथमिक स्तरावर, टीम सर्वात आधी पाहुण्यांच्या लसीच्या डोसची माहिती घेणार आहे. ज्या लोकांनी फक्त एक डोस घेतला आहे, त्यांना लग्नाच्या ठिकाणी येण्याआधी कमीत कमी ४८ तास आधी कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे. त्यानंतर लग्नात एन्ट्री करण्यापूर्वी पाहुण्यांना महत्त्वाच्या टेस्ट कराव्या लागणार आहे. ज्याप्रमाणे शूटिंगच्या सेटवर टीम ज्यापद्धतीने काळजी घेते त्याप्रमाणे विकी आणि कतरिनाच्या लग्नात काळजी घेतली जाणार आहे. टीम पाहुण्यांना प्रत्येक वेळी मास्क घालण्यासाठी, योग्य अंतर ठेवण्यासाठी आणि वेळोवेळी हात सॅनिटाइज करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.
आधी कोर्ट मॅरेज नंतर शाही विवाह सोहळा
बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल आधी मुंबईत कोर्ट मॅरिज करणार आहेत, त्यानंतर राजस्थानमध्ये भव्य लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाचे रितीरिवाज ७ ते ९ डिसेंबरमध्ये पार पडणार आहेत. ७ आणि ८ डिसेंबरला संगीत आणि मेहंदी सेरेमनी पार पडणार आहे. तर ९ डिसेंबरला ते दोघे सात फेरे घेणार आहेत. यावेळी कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.