Join us

विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ

By कोमल खांबे | Updated: February 27, 2025 14:47 IST

विकीचा 'छावा' सिनेमाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विकी चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

विकी कौशल त्याच्या 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून विकीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. सर्वत्र विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुकही होत आहे. अशातच विकीचा 'छावा' सिनेमाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विकी चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये चिमुकला आधी विकीचा गॉगल घेतो. मग त्याची टोपीही काढून घेत असल्याचं दिसत आहे. विकी त्याला म्हणतो की "मला पण तुझ्यासारखा हेअरकट करायचाय. माझे केस खूप वाढलेत". मुलाने टोपी घेतल्यानंतर विकी त्याला म्हणतो की मला तुझं टीशर्ट दे. त्यानंतर तो चिमुकला विकीचं टीशर्ट मागू लागतो. चिमुकल्याचं बोलणं ऐकून विकीही अचंबित होतो. विकी म्हणतो "खूपच हुशार मुलगा आहे". विकीचा चिमुकल्यासोबतचा हा क्यूट व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

विकीसोबत व्हिडिओत दिसणारा हा मुलगा 'छावा' सिनेमात झळकला आहे. छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूर लुटत असताना होणाऱ्या लढाईत एक छोटा मुलगा घराबाहेर येऊन रडत असतो. संभाजी महाराज त्याला वाचवताना दाखवण्यात आलं आहे. 'छावा'मध्ये दिसणारा हा मुलगा तोच आहे. त्याचं नाव अझलान असिफ असं आहे. या चिमुकल्याच्या अकाऊंटवरुनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

टॅग्स :विकी कौशल'छावा' चित्रपट