विकी कौशल ( Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. 9 डिसेंबरला विकी व कतरिना लग्नगाठ बांधणार (Vicky Kaushal and Katrina Kaif's wedding ) आहेत. नव वर-वधू आणि व-हाडी लग्नासाठी राजस्थानात पोहोचले आहेत आणि अशात विकी व कतरिनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.
होय, आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. नैत्राबिंद सिंग जदौन असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.6 ते 12 डिसेंबर दरम्यान चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्याच्या विरोधात वकील नैत्राबिंद सिंग जदौन यांनी सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे व्यवस्थापक, कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर सिक्स सेनेज फोर्ट हे हॉटेल आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापकाने 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत जिल्हाधिकाºयाांच्या परवानगीनंतर मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. सहा दिवस हॉटेल सिक्स सेसेंजपासून मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता बंद राहणार असल्याने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग मोकळा करण्याची विनंती संबधित तक्रारकर्त्याने केली आहे. विकी-कतरिनाच्या लग्नाबाबत आपला कोणताही वैयक्तिक राग नाही. पण चौथ का बारवरा हे अनेक शतकांचा इतिहास असलेलं प्राचीन चौथ माता मंदिर आहे. मंदिरात दररोज शेकडो यात्रेकरू प्रार्थना करण्यासाठी येतात. अशात मंदिर मार्ग बंद करणे गैर आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
लग्नसोहळ्यासाठी विकी आणि कतरिनासह त्यांचे कुटुंबीय राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. आज 7 डिसेंबरला संगीत सेरेमनी पार पडणार असल्याचं समजतंय. यामध्ये विकी आणि कतरिना ‘तेरी ओर’ या गाण्यावर डान्स करणार असल्याचं कळतंय.