Join us

'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:07 IST

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) यांचा 'बॅड न्यूज' सिनेमा रिलीज (१९ जुलै) झाला आहे. 'बॅड न्यूज'हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरल्याचं दिसून येत आहे. चित्रपटातील स्टारकास्टचा अभिनय आणि कथेने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. पण प्रश्न आहे सिनेमा ओटीटीवर कधी येणार? आता हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याबाबत अपडेट समोर आलं आहे. 

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडीओला विकले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होते की ''बॅड न्यूज'' OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. सुमारे दोन महिन्यांनी 'बॅड न्यूज' सप्टेंबरमध्ये ओटीटीवर धडकू शकतो. मात्र, स्टार कास्ट किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

'बॅड न्यूज' २ तास २२ मिनिटांचा असून सिनेमाला U/A सर्टिफिकेट मिळालेलं आहे.  नेहा धुपियादेखील सिनेमाता महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील विकी-तृप्तीची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.  'बॅड न्यूज' सिनेमातलं 'तौबा तौबा' (Tauba Tauba) हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय. विकीच्या डान्स स्टेप्सने लोकांना वेड लावलं आहे. या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठेका धरायला लावलाय. 

टॅग्स :विकी कौशलसेलिब्रिटीबॉलिवूडतृप्ती डिमरी