एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अभिनेता विकी कौशलच्या खासगी आयुष्यात फार काही ‘आॅल वेल’ नसल्याची ताजी बातमी आहे. विकीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने १०० कोटींवर कमाई केली. या चित्रपटानंतर विकी कौशल हे नाव ‘ए लिस्ट स्टार्स’च्या यादीत पोहोचले. साहजिकच विकीच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली. अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. केवळ इतकेच नाही तर या खुलाशानंतर हरलीनने विकीसोबतचा एक फोटो शेअर करत, या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे. होय, हरलीनने विकीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. शिवाय काही ब्रेकअपच्या फोटोंना लाईक्सही केले आहे.
विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 14:15 IST
अलीकडे एका शोमध्ये विकीने त्याच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले होते. पण आता या कपलच्या ब्रेकअपची खबर आहे.
विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये करण जोहर कॅटरिनावरून विकीची फिरकी घेताना दिसला होता.