रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. सिनेमाती रश्मिकाच्या पात्राचं शुटिंग पुर्ण झालं. यावर रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिग्दर्शक, क्रू मेंबर्स आभार मानले. तसेच विकी कौशलचं कौतुक केलं.
रश्मिकानं पोस्टमध्ये लिहलं, 'लक्ष्मण सर मला आश्चर्य वाटतं की एक माणूस किमान 1500 काम करणाऱ्या लोकांचा एवढा मोठा सेट एवढ्या शांत आणि संयमाने कसा हाताळू शकतो. सर तुम्ही मला येसूबाईच्या रूपात पाहिलं. याचा कोणीही विचारही केला नसेल. फक्त मीच नाही आणि संपूर्ण देशाला आश्चर्य वाटेल. तुमच्या दिग्दर्शनाखाली माझा परफॉर्मन्स संपुर्ण जगानं पाहावा यासाठी मी उत्सुक आहे. सिनेमाच्या सेटवर माझ्या आईनं मला पहिल्यादांचं एक पात्र साकारताना पाहिलं आणि ती रडली. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे तुमचे मनापासून खूप आभार'.
विकीचा 'महाराज' असं उल्लेख करत रश्मिकानं लिहलं, 'तुझ्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. तू चांगला आणि दयाळू व्यक्ती आहेस.आईने मला तुला शुभेच्छा देण्यासाठी सांगितले आहे'. तर रश्मिकाची पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीवर विकीने शेअर केली. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, 'संपूर्ण सेट तुझी एनर्जी मिस करतोय. वाईट दिवसांमध्ये तु केलेलं स्मितहास्य कधीच विसरणार नाही. तू प्रेरणा आहेस! येसूबाईंची भूमिका साकारल्याबद्दल धन्यवाद', अशा शब्दात विकीनं रश्मिकाचं कौतुक केलं.
सध्या शूट सुरू असलेला विकीचा 'छावा' पुढल्या वर्षी प्रदर्शित करण्याची योजना आहे.'छावा' चित्रटाच्या निमित्ताने 'जरा हटके जरा बचके'नंतर विकी आणि लक्ष्मण पुन्हा एकत्र आले आहेत. संभाजीराजांची व्यक्तिरेखा साकारण्याासाठी त्याने दाढीही वाढवली असून, विविध प्रकारचे प्रशिक्षणही घेतले आहे. 'छावा'चे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर करत आहे. लक्ष्मण उतेकरचा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. लक्ष्मण यांच्याकडे विषय उत्तमपणे सादर करण्याची हातोटी असल्याने हा सिनेमा ब्लॉकाबास्टर ठरणार असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.