कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal ) यांचं लग्न, या लग्नाचा शाही थाट अजूनही चाहत्यांच्या आठवणीत आहे. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अगदी लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांपासून, लग्नाच्या मेन्यूपर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या.कतरिना व विकीने राजस्थानातील माधोपूर येथे लग्नगाठ बांधली होती. या शाही लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता कॅट व विकीच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
होय, विश्वास बसणार नाही पण अग्नीच्या साक्षीने लग्नाच्या आणाभाका घेऊनही विकी व कतरिना कायदेशीर पती-पत्नी नव्हते. दोघांनीही सर्व रितीरिवाजानुसार लग्न केलं असलं तरी या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणजेच लग्नाला जवळपास 3 महिने होऊनही हे लग्न कायदेशीर नव्हतं.
‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात विकी व कतरिना कायदेशीररित्या पती-पत्नी झालेत. या कपलने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं होतं. पण लग्नाची कायदेशीर नोंदणी केली नव्हती. अलीकडे 19 मार्चला कतरिना व विकी दोघांनी कोर्टात कुटुंबीयांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा लग्न करत, लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. म्हणजे, गेल्या 19 तारखेला हे कपल कायदेशीररित्या विवाहबंधनात अडकलं. नोंदणी विवाहानंतर विकी व कतरिना दोघांनी रेस्टॉरंटमध्ये कुटुंबीयांसोबत याचं सेलिब्रेशनही केलं.
विकी व कतरिना यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानच्या माधोपूर येथे लग्न केलं होतं. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. लग्नानंतर हे कपल एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतं. दोघंही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत.