Join us

विकी कौशलने 'ह्या' सिनेमात गायले गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 5:18 PM

'एफ फॉर फ्यार...' या गाण्यातून अभिनेता विकी कौशलने सिंगिंगमध्ये पदार्पण केले आहे.

ठळक मुद्दे'मनमर्जियां' चित्रपट १४ सप्टेंबरला होणार प्रदर्शित विकी कौशल वाजवताना दिसणार डीजे

अनुराग कश्यप 'देव डी' सिनेमानंतर पुन्हा एकदा म्युझिकल प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'मनमर्जियां'. यातील गाणी संगीतबद्ध केली आहेत अमित त्रिवेदी यांनी. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील वेगळी योजना वापरली आहे. निर्माते दररोज एक गाणे प्रदर्शित करत आहेत. नुकतेच या सिनेमातील 'एफ फॉर फ्यार...' हे गाणे सादर केले आहे आणि या गाण्यातून अभिनेता विकी कौशलने सिंगिंगमध्ये पदार्पण केले आहे. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

या गाण्याबाबत संगीतकार अमित त्रिवेदी म्हणाले की, ''मनमर्जियां'मध्ये विकी कौशल डीजे वाजवताना दिसणार आहे. जर या सिनेमातील गाण्यात काही ओळी गायला तर खूप छान होईल, असे आम्हाला वाटले आणि ते छान प्रकारे जुळून देखील आले. जेव्हा विकीने हे गाणे ऐकले त्यावेळी त्याचा आवाज ऐकून तो थक्क झाला. त्याने गायनाची प्रक्रिया खूप एन्जॉ़य केली.'विकी कौशल म्हणाला की, मी खूप उत्सुक होतो आणि मी अनुराग यांना म्हणालो की, 'दोन-तीन वर्षांतून एकदा त्यांच्याहाती काम करण्यासाठी उत्सुक आहे. कारण कलाकार म्हणून ते नव्याने ओळख करून देतात. हे मला फार महत्त्वाचे वाटते. त्यांच्यासोबत काम करताना मला माझ्यातील नवनवीन गोष्टी समजल्या.''मनमर्जियां' या चित्रपटात तापसीने रूमी नावाच्या एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. विकी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. पण लग्न आणि जबाबदाऱ्या त्याला नको असतात. मग यात अभिषेकची एन्ट्री होते. रॉबी नावाच्या पंजाबी मुलाची भूमिका त्याने यात साकारली आहे. रूमीसोबत अरेंज मॅरेज करण्यासाठी रॉबी तयार असतो. 'मनमर्जियां' चित्रपट १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :विकी कौशलअनुराग कश्यप