Join us  

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहता येणार 'द ग्रेट इंडियन फॅमिली'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:44 PM

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

अभिनेता विकी कौशलच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.  विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. विकीने यामध्ये 'भजन कुमार' ही भूमिका साकारली आहे.  २२ सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवर हा फॅमिली ड्रामा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत. 

विकी कौशल आणि मानुषी  यांच्या अभिनयाने गाजलेला हा सिनेमा चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता ओटीटीवर दाखल होत आहे. या सिनेमात विकीचा कमाल अभिनय आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' अमेझॉन प्राइमवर पाहायला उपलब्ध आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली'  हा चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड आहे. 

'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे आणि यशराज फिल्म्स या बॅनरची निर्मिती असून प्रीतमने या चित्रपटाला संगीत दिले आहे. तर विकी कौशल व्यतिरिक्त कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा, मनोज पाहवा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडसिनेमा