बॉलिवुड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कॅटरिना विकीच्या परिवारासोबत किती रुळली आहे हे अनेकदा दिसले. लग्नानंतर स्वयंपाक करणे असो, विकीसाठी शिरा बनवणे असो, करवा चौथ साजरा करणे असो कॅटरिना कौशल परिवाराची सून म्हणून दिसली आहे. पण विकी आणि कॅटरिना हे एकमेकांपेक्षा इतके वेगळे असूनही कसे काय प्रेमात पडले असा प्रश्न पडतो. तसंच विकीच्या आई वडिलांना कॅटरिना आवडली असेल का या सर्व प्रश्नांचे उत्तर विकीने एका मुलाखतीत दिले आहे.
विकीने कॅटरिनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती यावर विकीने उत्तर दिले आहे. “माझे आई-बाबा खूप खूश होते. त्यांना ती खूप आवडते. जर एखाद्याचं मन चांगलं असेल, तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुमच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत त्याचं प्रतिबिंब दिसतं,” असं म्हणत विकीने कॅटरिनाचं खूप कौतुक केलं आणि ती कायम पॉझिटिव्ह असते असंही सांगितलं.
विक्कीने त्याचे लग्न आयुष्यातील सर्वात सुंदर चॅप्टर आहे असं म्हटलंय. 'आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेणारा जोडीदार आयुष्यभरासाठी सोबत असणं, ही सर्वात अद्भुत भावना आहे. कारण, तीच गोष्ट तुम्हाला शांत आणि आनंदी ठेवते.'
विकी सध्या 'गोविंदा नाम मेरा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्याने कॅटरिनाचे खूप कौतुक केले. विकी कॅटरिना बॉलिवुडमधले क्युट कपल म्हणून ओळखले जातात. 'राजी' सिनेमानंतर तर नवरा विकी कौशल सारखाच हवा अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.