विकी कौशल (vicky kaushal) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामागचं कारण आपल्या सर्वांना माहितच आहे ते म्हणजे, विकी कौशलची भूमिका असलेला 'छावा' सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. काल २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर एक खास कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी विकीने कुसुमाग्रजांची 'कणा' कविता सादर केली. त्यानिमित्त विकीने सर्वांशी बोलताना खास किस्सा सांगितला.
विकीने सांगितला राज ठाकरेंसोबतचा खास किस्साविकीला मंचावर आमंत्रित करण्यात आलं. त्यावेळी विकीने सर्वांना खास किस्सा सांगितला. विकीला राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची 'कणा' कविता वाचायला सांगितलं. विकीला 'कणा' शब्दाचा अर्थ माहित नसल्याने त्याने राज ठाकरेंना त्या शब्दाचा अर्थ विचारला. तेव्हा राज ठाकरेंनी कणा म्हणजे Spine असा अर्थ विकीला सांगितला. 'छावा' सिनेमा केल्यानंतर मला कणा शब्दाचा खरा अर्थ समजला, अशी भावना विकीने व्यक्त केली.