Join us

विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर झाला होता अपमान, आईसमोरच रडले; अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 12:03 PM

त्यांना सिनेमाच्या सेटवर अपमानित करण्यात आलं होतं.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीवर आहे. विकीचे वडील श्याम कौशल (Shyam Kaushal) हे सिनेसृष्टीत स्टंटमन होते. तर आता त्यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या अभिनय कौशल्यातुन बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र एकेकाळी श्याम कौशल सिनेमाच्या सेटवर अपमानित व्हायचे. तेव्हा ते घरी येऊन रडायचे असा खुलासा विकीने केला.

विकी कौशल आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त विकीने 'वी आर युवा'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने वडिलांबाबतीत मनमोकळेपणाने संवाद साधला. तो म्हणाला, 'माझ्या आईवडिलांनी मला आणि भावाला खूप स्ट्राँग बनवलं. कारण त्यांनी आमच्यापासून कधीच काही लपवलं नाही. मला आठवतंय माझे वडील एकदा आमच्यासमोर रडले होते. त्यांना सिनेमाच्या सेटवर अपमानित करण्यात आलं होतं. ते केवळ एक स्टंटमॅन होते. इतकंच नाही तर ते माझ्या आईसमोरही रडायचे आणि आम्हाला येऊन सांगायचे की मी तुमच्या आईसमोर रडलो.'

तो पुढे म्हणाला,'माझी आईही आम्हाला म्हणाली होती की तुमच्या बाबांना सेटवर सिनिअर्स ओरडले. म्हणून ते रडले. आम्ही भावनिकदृष्ट्याही स्ट्राँग व्हावं म्हणून त्यांनी कायम प्रयत्न केले. प्रत्येक घरातील वडील असतात तसेच माझे वडील आहेत ज्यांनी आम्हाला प्रत्येक दृष्टीने स्ट्राँग राहायला शिकवलं. जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा कशाप्रकारे ते हँडल करायचं हेही त्यांनी शिकवलं.'

विकी कौशल लवकरच 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि 'सॅम बहादुर' या सिनेमात झळकणार आहे. सध्या तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच त्याचं 'कन्हैय्या ट्विटर पे आजा' हे गाणं रिलीज झालं आहे.

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूड