Join us

OMG! ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त आहे विकी कौशल, स्वत: केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 3:00 PM

होय, सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना विकीने हा धक्कादायक खुलासा केला.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी  ‘भूत पार्ट-1 : द हॉन्टेड शिप’ या हॉरर सिनेमात विकी दिसला होता. 

नव्या दमाचा, नव्या पिढीचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल सध्या लॉकडाऊनमुळे घरात वेळ घालवतोय. विकीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. पण हाच तुमचा आमचा आवडता विकी दीर्घकाळापासून एका गंभीर आजाराचा सामना करतोय. होय, सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना विकीने हा धक्कादायक खुलासा केला.

होय, चाहत्यांसोबतच्या चॅट सेशनमध्ये विकीने या आजाराबद्दलचा धक्कादायक अनुभव शेअर केला.तू कशी प्रत्यक्षात भूत पाहिले आहे का?असा प्रश्न एका चाहत्याने त्याला केला. यावर विकीने दिलेले उत्तर पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. चाहत्याला उत्तर देताना त्याने लिहिले,‘ प्रत्यक्षात मी कधीच भूत पाहिले नाही. पण भूताइतकाच मी एका गोष्टीला घाबरतो. ती म्हणजे, स्लीप पॅरालिसिस हा आजार. गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराला मी तोंड देत आहे. मी खूप थकलेलो असेल तर मला याचा त्रास होतो. या आजारात तुमचे मन जागे झालेले असते. पण शरीर निद्रावस्थेतच असते. तुम्ही तुमचे हात-पाय  हलवू शकत नाही.  बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. तुमच्या मानगुटीवर जणू  कोणीतरी बसले आहे असे जाणवते. ही अवस्था काही सेकंदासाठी असते. पण यात प्रचंड भीती वाटते.’

हॉरर सिनेमा पाहताना मला प्रचंड भीती वाटते, हेही यावेळी त्याने सांगितले. मी जगातला सर्वात भित्रा व्यक्ती आहे़, असे तो म्हणाला.कधी घाबरून वॉशरूममधून दुस-या रूममध्ये पळत गेला आहेस का? या एका चाहत्याच्या प्रश्नावरही त्याने होकारार्थी उत्तर दिले. हो, असे अनेकदा झालेय, असे त्याने सांगितले.

काही दिवसांपूर्वी  ‘भूत पार्ट-1 : द हॉन्टेड शिप’ या हॉरर सिनेमात विकी दिसला होता. हा त्याचा पहिला हॉरर सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर  मात्र त्याचा हा चित्रपट फार कमाल  दाखवू शकला नाही.

टॅग्स :विकी कौशल