Join us

कतरिनाचा कोणता सिनेमा तुला आवडतो? विकी कौशलने दिलं उत्तर; 'टायगर' नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 09:20 IST

सलमान-कतरिनाचा 'टायगर' विकीच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत नाही?

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज होत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या विकी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. दुसरीकडे विकीची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफनेही (Katrina Kaif) त्याच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून भरभरुन कौतुक केलं आहे. विकी-कतरिना जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच विकी कौशलला कतरिना अभिनीत आवडता सिनेमा कोणता असं विचारण्यात आलं. तेव्हा त्याने कोणतं नाव घेतलं वाचा.

कतरिना कैफने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये 'वेलकम','टायगर सीरिज','जिंदगी ना मिलेगी दोबारा' या काही सिनेमांचा समावेश आहे. दरम्यान 'पिंकव्हिला'शी बोलताना विकीला कतरिनाचा आवडता सिनेमा कोणता असं विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, "२००८ मध्ये आलेला 'सिंग इज किंग' सिनेमा मी खूप एन्जॉय केला. तो सर्वात मनोरंजनपर सिनेमांपैकी एक आहे. तसंच 'वेलकम'हा सिनेमा मला आजही आवडतो. मी अनेकदा त्यातला 'कंट्रोल उदय कंट्रोल' हा डायलॉग बोलत असतो. तिच्यासमोरही मी हा डायलॉग अनेकदा म्हटला आहे."

'सिंग इज किंग' आणि 'वेलकम' हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले होते.  दोन्हीमध्ये कतरिनाने अक्षय कुमारसोबत रोमान्स केला होता. विशेष म्हणजे सलमान-कतरिनाच्या सुपरहिट 'टायगर'  सिनेमाचं नाव विकीने घेतलं नाही. विकी आणि कतरिनाने अद्याप एकाही सिनेमात एकत्र काम केलेलं नाही. दोघांची लव्हस्टोरी ही पडद्यामागेच राहिली. एका पार्टीत दोघांची भेट झाली, लगेच त्यांच्यात एक कनेक्शन निर्माण झालं. काही वर्ष डेट केल्यानंतर २०२१ मध्ये ते लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील एका पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफबॉलिवूडसिनेमा