ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:31 PM2019-02-05T12:31:58+5:302019-02-05T12:33:08+5:30

स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी बॉलिवूड स्टार्सला अनेक दिव्यातून जावे लागते. पण विकी कौशलला मात्र काहीही करावे लागत नाही. याचे कारण म्हणजे, त्याला असलेला एक ‘सुंदर’ आजार.

vicky kaushal reveals interesting facts about his body film uri transformation | ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!

ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!

ठळक मुद्दे‘उरी’मधील अ‍ॅक्शन सीन्स कठीण होते. सगळे लाईव्ह शॉट्स होते. अनेक गोष्टी रिअल होत्या. पण हे सगळे करताना मज्जा आली. मेजरची भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, असेही त्याने सांगितले.

पडद्यावर भूमिका जिवंत करताना बॉलिवूड कलाकारांना अनेक दिव्यातून जावे लागते. हिरो असो वा हिरोईन वजनाचा काटा जराही पुढे सरकू नये, यासाठी कडक डाएट फॉलो करावे लागते. आवडत्या खाद्यपदार्थांवर पाणी सोडावे लागते. केवळ इतकेच नाही अनेक तास जिममध्ये घाम गाळावा लागतो. पण ‘उरी’स्टारविकी कौशल हा मात्र याला अपवाद म्हणायला हवा. होय, विकीला यापैकी काहीही करावे लागत नाही. याचे कारण म्हणजे, त्याला असलेला एक ‘सुंदर’ आजार. होय, खुद्द विकीने एका मुलाखतीत हा खुलासा केला. मला वजन न वाढण्याचा ‘सुंदर’ आजार असल्याचे त्याने सांगितले.


एका ताज्या मुलाखतीत विकी या ‘सुंदर’ आजाराबद्दल बोलला. ‘उरी’साठी मला १५ किलो वजन वाढवायचे होते. ‘राजी’चे शूटींग सुरु असताना मला या चित्रपटाची आॅफर आली होती. त्यावेळी माझे वजन ७७ किलो होते. यानंतर मी ९० किलोपर्यंत वजन वाढवले. पण ते वाढवण्यासाठी मला प्रचंड कष्ट पडले. कारण मला वजन न वाढण्याचा ‘सुंदर’ आजार आहे. काहीही खा, माझे वजन वाढत नाही. ‘उरी’ संपल्यानंतर मी एकही दिवस जिममध्ये गेलो नाही. यादरम्यान मी खूप जंक फूड, पिज्जा, पास्ता असे सगळे खाल्ले. पण माझे वजन वाढण्याऐवजी ८ किलो घटले. त्यामुळे हा खरोखरच चांगला आजार आहे,असे विकी म्हणाला.


‘उरी’मधील अ‍ॅक्शन सीन्स कठीण होते. सगळे लाईव्ह शॉट्स होते. अनेक गोष्टी रिअल होत्या. पण हे सगळे करताना मज्जा आली. मेजरची भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती, असेही त्याने सांगितले. ‘उरी’ने बॉक्सआॅफिसवर केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे आत्मविश्वास दुणावल्याचेही त्याने सांगितले. ‘उरी’च्या यशानंतर माझा आत्मविश्वास वाढलाय. पण माझ्या स्वभावात कुठलाही बदल झालेला नाही. माझे अनेक मित्र आहेत, ज्यांच्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर असतात. माझ्या वागण्याबोलण्यात जराही अंहकार डोकावला की, ते मला लगेच सावध करतात आणि मी लगेच स्वत:ला सांभाळतो, असे तो म्हणाला.

Web Title: vicky kaushal reveals interesting facts about his body film uri transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.