Join us

अंगावर शहारे आणणारा 'सॅम बहादूर'चा ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 19:57 IST

'सॅम बहादूर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर  प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सॅम बहादूर'चा ट्रेलर पाहून चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एवढेच नाही तर उरी चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही विकी भारतीय लष्कराच्या गणवेशात डॅशिंग दिसत आहे.

देशभक्तीची भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे. रिलीज होताच 'सॅम बहादूर'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.  1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये  'सॅम बहादूर' प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  त्याचा दमदार अभिनय आणि चोख संवादफेक याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

  चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम बहादूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे.  1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी अवघ्या 13 दिवसांत शत्रूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.  

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूड