Join us  

चोरी चोरी, चुपके चुपके..! लग्नाआधी कतरिना कैफला चोरुन भेटायचा विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 4:05 PM

Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, ज्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते.

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात, ज्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. विकीचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याचे प्रमोशनही कॅटने केले होते. आता नुकताच विकीने एक खुलासा केला आहे. नुकताच विकी कौशल कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. त्यावेळी विकीने त्याच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. 

विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नाआधी एकमेकांना डेट करत होते. मीडियामध्ये याच्या अफवा पसरल्या होत्या, पण लग्न होईपर्यंत दोघांनीही याची पुष्टी केली नव्हती. आता जेव्हा विकी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला तेव्हा कपिलने त्याला विचारले की लग्नापूर्वी तो कतरिनाला गुपचूप कुठे भेटायचा. कपिल म्हणाला, अशी कुठली तरी जागा असावी जिथे तू भेटायचास, कोणाला कळू दिले नाही. ज्याला उत्तर देताना विकीने हे गुपित असल्याचे सांगितले होते. विकीने हसत हसत कपिलचा हा प्रश्न टाळला.

विकी कौशल कतरिनावर खूप प्रेम करतो. ज्याचा उल्लेख तो जाहीरपणे करायला मागेपुढे पाहत नाही. आता अलीकडे, कॅट आणि त्याच्या वेगवेगळ्या सवयींबद्दल बोलत असताना, विकीने सांगितले की तो सकाळी लवकर कॅटपासून दूर जातो. कारण त्याला सकाळी आपले काम अतिशय शांतपणे करायला आवडते आणि त्याला कोणत्याही चर्चेत पडायचे नसते. तर कॅट त्याच्या विरुद्ध आहे. 

विक्कीला नाश्त्यानंतरच बोलायला आवडतेयाबद्दल बोलताना विकी म्हणाला, 'मी आणि कतरिना सकाळी उठतो तेव्हा आम्ही पूर्णपणे वेगळे असतो कारण मी सकाळी उठतो, कॉफी पितो आणि नाश्त्यानंतरच कोणत्याही प्रकारच्या चर्चेत गुंततो. दुसरीकडे, कतरिना सकाळी उठल्याबरोबर कोणत्याही कामात सहज गुंतते, पण मी ती चर्चा टाळण्याचा प्रयत्न करतो.

कतरिना दर आठवड्याला मीटिंग घेतेविकीने कॅटबद्दल पुढे सांगितले की, 'सर्वात मजेदार अनुभव तो असतो जेव्हा कतरिना दर आठवड्याला घरी मीटिंग करते. ती घराच्या बजेटवर संपूर्ण स्टाफसोबत चर्चा करते. पैसे कसे खर्च होत आहेत याचा हिशेब ती ठेवते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा ती चर्चा होते तेव्हा मला मजा येते. त्यावेळी मी प्रेक्षकांप्रमाणे पॉपकॉर्न खात असतो.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ