Join us

विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांना केला मुजरा, म्हणाला - "तुमचा त्याग आणि राष्ट्रप्रेम.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 17:03 IST

छत्रपती शंभूराजांच्या जयंतीनिमित्त विकी कौशलने खास मराठी भाषेत शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे (vicky kaushal, sambhaji maharaj)

विकी कौशल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. विकीला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. विकी सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. 'छावा' असं या सिनेमाचं नाव आहे. विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विकीने खास पोस्ट लिहिली आहे.

विकीने सोशल मीडियावर संभाजी महाराजांचा खास फोटो पोस्ट करुन लिहिलंय की, "स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. महाराजांचा पराक्रम, त्याग आणि राष्ट्रप्रेम आम्हास सदैव प्रेरणादायी आहे. संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा. धर्मरक्षक छावा हृदयी जगवावा. जय भवानी जय शिवाजी" अशी खास मराठीत पोस्ट विकीने लिहीली आहे.

'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. लक्ष्मण यांचं दिग्दर्शन असलेला 'मिमी' सिनेमा चांगलाच गाजला. आता लक्ष्मण पहिल्यांदाच 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून ऐतिहासीक कलाकृती भेटीला आणणार आहेत. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय मराठमोळा संतोष जुवेकर सुद्धा खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :विकी कौशलसंभाजी राजे छत्रपती