Join us

ढोल ताशाचा गजर अन् विकी कौशलचा मराठमोळा अंदाज, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "भावा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:22 IST

मुंबईत 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ विकी कौशलने शेअर केला आहे. 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी 'छावा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मुंबईत 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ विकी कौशलने शेअर केला आहे. 

'छावा' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला विकीने ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत एन्ट्री घेतली होती. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओत विकी कौशल पांढऱ्या रंगाच्या सलवार कुर्तामध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. ढोल-ताशाच्या तालावर त्याने ठेका धरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विकी कौशलची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते त्याचं कौतुक करत आहेत. 

"14 फेब्रुवारीला एकच योजना – छावा पाहायचा!", "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची इच्छा", "जेव्हा पंजाबी स्वॅग आणि मराठी मॅडनेस एकत्र येतो", "सिनेमा सुपरहिट होणार", "हा चित्रपट तुमचं आयुष्य बदलवणार", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

'छावा' सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, संतोष जुवेकर या मराठी कलाकारांचीही या सिनेमात वर्णी लागली आहे.  

टॅग्स :विकी कौशलसिनेमा