Join us

"तुम्ही जे व्हिडीओ शेअर करताय त्यामुळे.."; विकी कौशलने 'छावा'च्या रिलीजनंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:01 IST

'छावा' सिनेमाच्या रिलीजनंतर विकीने शेअर केलेली खास पोस्ट चर्चेत आहे (vicky kaushal, chhaava)

'छावा' सिनेमा (chhaava movie) काल १४ फेब्रुवारीला जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज झालाय. हा सिनेमा पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी प्रेक्षक थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी करत आहेत. पहिल्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. अशातच 'छावा' रिलीज झाल्यावर विकीने (vicky kaushal) प्रेक्षकांचे आभार मानणारी खास पोस्ट शेअर केलीय. विकीच्या १०  वर्षांच्या करिअरमधील 'छावा' हा त्याच्या करिअरला नव्हे तर आयुष्याला कलाटणी देणारा सिनेमा ठरलाय. विकीने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. 

विकीने सोशल मीडियावर केली पोस्ट

विकी कौशलने प्रेक्षकांचे आभार मानणारी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन विकी लिहितो की, "तुमच्या प्रेमाने 'छावा'ला खऱ्या अर्थाने जीवंत केलंय! तुमचे येणारे मॅसेज, फोन्स, छावा पाहताना तुम्ही शेअर करत असलेले व्हिडीओ.. मी सर्व पाहतोय. तुम्ही सर्वांनी इतकं भरभरुन प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप आभार. संभाजी महाराजांची शौर्यगाथा साजरी करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचे मी खूप आभार मानतो." असं कॅप्शन लिहून विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार! हा छावामधील संवाद शेवटी विकीने लिहिला.

छावाची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

'छावा' सिनेमा काल १४ फेब्रुवारीला रिलीज झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं वादळ घोंघावलं. ट्रेड रिपोर्टनुसार 'छावा'  सिनेमाने पहिल्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा विकी कौशलचा 'छावा' हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याच्या 'उरी' आणि 'बॅड न्यूज' ने ९ आणि ८ कोटींची कमाई केली होती. ज्याप्रकारे 'छावा'ला प्रतिसाद मिळतोय त्यावरुन सिनेमा येत्या काही दिवसात अनेक रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे.

टॅग्स :विकी कौशल'छावा' चित्रपटरश्मिका मंदानाअक्षय खन्ना