विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. 'छावा' सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. जगभरातले तमाम शिवप्रेमी 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी आतुर आहेत. 'छावा' सिनेमाच्या रिलीजआधी काल (१२ फेब्रुवारी) म्युझिक लाँच सोहळा झाला. या सोहळ्याला विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि सिनेमाची सर्व स्टारकास्ट उपस्थित होते. यावेळी विकी कौशलच्या खास जॅकेटने सर्वांचं लक्ष वेधलं.
विकीची शिवरायांना खास मानवंदना
विकी कौशलने काल म्युझिक लाँच सोहळ्यात अभिनेत्री रश्मिका मंदाना, 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि इतरही अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी विकी कौशलने डोळ्यांवर गॉगल आणि काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. त्यावेळी विकीच्या जॅकेटवर असलेल्या खास चित्राने सर्वांचं लक्ष वेधलं. विकीच्या जॅकेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र होतं. विकीने नुकतंच सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट करुन छत्रपती शिवरायांना या निमित्त अनोखी मानवंदना दिली आहे. विकीने फोटो पोस्ट करुन कॅप्शनमध्ये "छत्रपति शिवाजी महाराज की जय ! 🚩" असं लिहिलंय.
'छावा'चा म्युझिक लाँच सोहळा
काल मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMAAC) मध्ये 'छावा' सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्गज संगीतकार-गायक ए.आर.रहमान उपस्थित होते. यावेळी विशेष गोष्ट अशी घडली ती म्हणजे मराठमोळी गायिका वैशाली सामंतला, ए. आर. रहमान यांच्यासोबत परफॉर्मन्स करायची संधी मिळाली. वैशालीने 'छावा'मधील 'आया रे तुफान' हे गाणं रहमान यांच्यासोबत गायलं. उपस्थित प्रेक्षकांनी या गाण्यांना चांगलीच दाद दिली. उद्या १४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा रिलीज होणार आहे.