Join us

विकी कौशलच्या 'उरी'चा आणखी एक नवा विक्रम, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:36 PM

 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय.

ठळक मुद्देया सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने आत्तापर्यंत 157 कोटी रूपयांची कमाई केली आहे

 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने आत्तापर्यंत 157 कोटी रूपयांची कमाई केली आहे.  जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’ येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने सर्जिकल स्ट्राइकने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा याच सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. 

नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उरीच्या टीमने वाघा बॉर्डरवर जाऊन जवानांची भेटी घेतली.  येथे पोहोचल्यानंतर विकी कौशल व यामी गौतम यांनी भारतीय जवानांना सलामी दिली. सोबतचं त्यांच्यासोबत धम्माल मस्ती केली.विकीच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे.दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.  यामी गौतमच्या वाटेला छोटी भूमिका आली आहे;  मात्र या छोट्या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत.

टॅग्स :उरीविकी कौशल