Join us  

राजकुमार राव नाही 'या' अभिनेत्याला होती 'स्त्री' ची ऑफर, नकार दिल्याने आता होतोय पश्चात्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:17 PM

राजकुमार राव आधी दुसऱ्याच अभिनेत्याला सिनेमाची ऑफर देण्यात आली होती.

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao)  यांच्या हॉरर कॉमेडी 'स्त्री 2' सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. एका आठवड्यातच सिनेमाने देशात ३०० कोटी पार कमाई केली आहे. 2018 साली आलेल्या 'स्त्री' हा सीक्वेल आहे. यासाठी प्रेक्षकांना तब्बल ६ वर्ष वाट बघावी लागली. दरम्यान राजकुमार राव आधी दुसऱ्याच अभिनेत्याला सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. त्याने सिनेमा नाकारल्याने राजकुमारची 'स्त्री' मध्ये एन्ट्री झाली होती. कोण आहे तो?

2018 साली 'स्त्री' आला आणि सगळेच राजकुमारचे चाहते झाले. त्याच्या 'विक्की' या कॅरेक्टरने सगळ्यांना प्रेमात पाडलं. श्रद्धा कपूरसोबतची त्याची केमिस्ट्रीही गाजली. पण तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटेल की राजकुमार राव आधी अभिनेता विकी कौशलला (Vicky Kaushal)  'स्त्री'ची ऑफर देण्यात आली होती. मात्र  त्याने नकार दिला होता. एका मुलाखतीत विकी कौशलला विचारण्यात आलं की असा कोणता सिनेमा आहे जो तू रिजेक्ट केलास आणि नंतर तुला याचा पश्चात्ताप झाला? यावर विकी म्हणाला, 'स्त्री. कारण तेव्हा मी मनमर्जिया सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो.'

विकी 'स्त्री' मध्ये जरी दिसला नसला तरी 'मनमर्जिया' मधील त्याच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं. मात्र सिनेमाला फारसं यश मिळालं नव्हतं. तर दुसरीकडे 'स्त्री' ब्लॉकबस्टर ठरला होता. 'स्त्री' मुळे पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनाही ओळख मिळाली. शिवाय श्रद्धा कपूरचं नशीबच उजळलं. आता लवकरच 'स्त्री 3' येणार असल्याचीही चर्चा आहेय.

टॅग्स :विकी कौशलराजकुमार रावबॉलिवूडसिनेमाश्रद्धा कपूर