Join us  

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 9:01 PM

विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे असं राज ठाकरेंनी कौतुक केले.

मुंबई – दिवाळीनिमित्त मनसेकडून यंदाही दादरच्या शिवाजी पार्क इथं दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीम-जावेद यांनी केले. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यानंतर आता दुसऱ्यादिवशी बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी शिवाजी पार्कच्या दीपोत्सावाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेल्या अभिनेता विकी कौशलबाबतहीराज ठाकरेंनी खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा आगामी काळात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. राज ठाकरे म्हणाले की, विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे, त्याचा पुढचा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या सिनेमात धर्मवीर संभाजीच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. त्याचेही प्रमोशन आज नाही. मलाही आताच कळाले आहे. त्यामुळे सिनेमा खोटी दाढी नको म्हणून भूमिकेसाठी त्याने खरी दाढी वाढवली आहे असं राज यांनी सांगितले.

त्याचसोबत मी आज भाषण करायला आलो नाही, माझे मित्र माझ्या विनंतीला मान देऊन इथं आले. माझे मित्र राजकुमार हिरानी यांचा डिसेंबरमध्ये सिनेमा येतोय, त्याचे प्रमोशन नाही. दिवाळीसाठी मी त्यांना आमंत्रित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सलीम-जावेद करणार आहेत. त्यामुळे दुसऱ्यादिवशी तुम्ही आला तर मला आनंद होईल असं मी म्हटलं. त्यांनी माझ्या प्रेमाखातीर एक सेकंदाचाही वेळ न लावता आज इथं कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं. राजकुमार हिरानी, साजिद नाडियावाला, आशुतोष गोवारीकर, विकी कौशल यांनी मनसेच्या दीपोत्सवात उपस्थिती लावली होती.

विकीचा सॅम बहादूर सिनेमा चर्चेत

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर  प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सॅम बहादूर'चा ट्रेलर पाहून चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एवढेच नाही तर उरी चित्रपटाप्रमाणे या चित्रपटातही विकी भारतीय लष्कराच्या गणवेशात डॅशिंग दिसत आहे. देशभक्तीची भावना जागृत करणारा हा ट्रेलर आहे. रिलीज होताच 'सॅम बहादूर'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये  'सॅम बहादूर' प्रदर्शित होणार आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा दमदार अभिनय आणि चोख संवादफेक याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :विकी कौशलराज ठाकरे