कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. एखाद्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात येत आहे. आता प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि राजकुमार राव यांची बिल्डिंग सील करण्यात आली आहे.
विकी कौशल आणि राजकुमार राव अंधेरीतील ऑबेरॉय स्प्रिंग्स या बिल्डिंगमध्ये राहातात. या बिल्डिंगमध्ये एका ११ वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या बिल्डिंगचा काही भाग सील करण्यात आला आहे. या बिल्डिंगमध्ये कोरोग्राफर अहमद खान, चित्रंगदा सिंग, चाहत खन्ना, सपना मुखर्जी, नील नितिश मुकेश, पत्रलेखा यांसारखे सेलिब्रेटी देखील राहातात.
या बिल्डिंगमधील सी विंगमध्ये एका डॉक्टरचे कुटुंब राहाते. त्यांच्या ११ वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, ऑबेरॉय स्प्रिंग्सची सी विंग पूर्णपणे सील करण्यात आली आहे तर ए आणि बी बिंग अंशतः सील करण्यात आली आहे. अभिनेता अर्जन बाजवाने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, लिफ्टपर्यंत जाणे देखील आम्ही टाळत आहोत. ए आणि बी विंगमधील लोक देखील घराच्या बाहेर पडत नाहीयेत. सी विंग मध्ये अर्जनसोबत चित्रगंदा, प्रभू देवा, चाहत खन्ना, राहुल देव-मुग्धा गोडसे आणि विपुल शाह राहातात.
बिल्डिंगमध्ये कोरोनाचा रुग्ण मिळाल्यानंतर आता ही संपूर्ण बिल्डिंग सॅनिटाईज केली जात आहे.