सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेते शेखर सुमन सुरूवातीपासून आवाज उठवत आहेत. आता त्यांचा मुलगा अध्ययन सुमनने त्याला म्युझिकल ट्रिब्यूट दिलंय. अध्ययनने सुशांतचा सिनेमा 'एमएस धोनी'तील गाणं 'जब तक'चं रीमेक केलंय. या गाण्यात अध्ययनने सुशांतचं आयुष्य लिहिलंय. सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने तिच्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
व्हिडीओत आहे अंकिताचे डायलॉग
अंकिता लोखंडे तिच्या ट्विटर हॅंडलवर हे गाणं पोस्ट आहे आणि सोबतच लिहिले आहे की, 'माझ्याकडे शब्द नाहीत अध्ययन'. या व्हिडीओत अंकिता लोखंडेचाही आवाज ऐकायला मिळतो. सुशांतच्या मृत्यूनंतर ज्या मुलाखती अंकिताने दिल्या होत्या. त्यातील हा आवाज आहे. अध्ययनने हे गाणं गायलंही चांगलं आहे.
पैशांसाठी नाही हा व्हिडीओ
अध्ययन सुमनने हे गाणं यूट्यूब चॅनलवरही शेअर केलं आहे. सोबतच एक नोट लिहिली आहे की, ही मनापासून सुशांतला श्रद्धांजली आहे आणि हे गाणं चॅनलवर मॉनेटाइज केलं गेलं नाहीये. या गाण्यात सुशांत गिटार वाजवता, मस्ती करताना आणि अंकितासोबतही दिसतो.
मनाला भिडणारे शब्द
एक दिल था बेचारा जो सह न सकाजो बातें थीं दिल में वो कह न सकाएक झोंका था हवा का, आया और चला गयामुड़ के देखा नहीं बस जाते-जाते रुला गयातुम जैसे गए, वैसे कोई जाता नहींजो जाता है तो फिर लौट के आता नहींअब हम और तुम बस ख्वाबों में मिलेंगेजैसे सूखे हुए फूल किताबों में मिलेंगे।
हे पण वाचा :
VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'
हिंदी बोलता येत नसूनही पोलॅंडच्या मुलाने गाण्यातून सुशांतला वाहिली श्रद्धांजली, इमोशनल झाले फॅन्स!