Join us

Video : बॉलिवूडमध्ये हे आहेत ‘टॉप ५’ श्रीमंत सेलिब्रिटी !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 12:37 PM

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत जे श्रीमंतीच्या बाबतीत टॉपवर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...

-रवींद्र मोरे चित्रपटात काम करणारे बॉलिवूड स्टार लोकांच्या मनावर तर राज करतातच, शिवाय ते संपत्तीच्या बाबतीतही तेवढेच श्रीमंत असतात. त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून चांगल्या उद्योगपतींसारखीच खूप संपत्ती कमविली आहे. बॉलिवूडमध्ये असेच काही स्टार्स आहेत जे श्रीमंतीच्या बाबतीत टॉपवर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत... ५. अक्षय कुमार* एकूण संपत्ती १७९.६७ मिलियन डॉलर अक्षय कुमार बॉलिवूडचा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याचा परिवार पंजाबी समुदायाशी संबंधीत आहे. अक्षयचे लहानपणाचे नाव राजीव भाटिया आहे. शिवाय त्याचा जन्म अमृतसर पंजाबमध्ये झाला होता. अक्षयच्या यशस्वी चित्रपटांमध्ये  मोहरा, सबसे बडा खिलाडी, धडकन, खिलाडी, हेरा-फेरी, गरम मसाला आदी चित्रपटांचे नाव आवर्जून घेता येईल. अक्षयला २००२ मध्ये सर्वप्रथम फिल्मफेयर अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. एका सर्वेक्षणानुसार अक्षयची एकूण संपत्ती १७९.६७ मिलियन डॉलर एवढी आहे.  ४. आमिर खान* एकूण संपत्ती १८४.०८ मिलियन डॉलर  आमिर खान उर्फ आमिर हुसैन खानचा जन्म १४ मार्च १९६५ ला मुंबईमध्ये झाला होता.  आमिर खान बॉलिवूडचा ‘मि. परफेक्टनिस्ट’च्या नावाने ओळखला जातो. एक यशस्वी अभिनेता म्हणून आमिरने स्वत:ला सिद्ध केले आहे. आमिरचे चित्रपट फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही पाहिले जातात आणि पसंतदेखील केले जातात. २०१६ मध्ये आलेल्या ‘दंगल’ने तर चीनमध्ये खूपच पैसा कमविला.  एका सर्वेनुसार आमिरजवळ एकूण १८४.०६ मिलियन डॉलय एवढी संपत्ती आहे.   ३. सलमान खान* एकूण संपत्ती २०० मिलियन डॉलर  सलमान खानला ‘सल्लू’ या नावानेही ओळखले जाते. बॉलिवूडमधला सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून सलमानची ओळख आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारा सल्लू मियॉँचे विदेशातही करोडो फॅन आहेत. सलमानला सोशल मीडियावरही तेवढेच पसंत केले जाते. चित्रपटांबरोबरच सलमान काही टिव्ही प्रोग्रॅमदेखील होस्ट करतो. त्याची एकूण संपत्ती २०० मिलियन डॉलर आहे. २. अमिताभ बच्चन* एकूण संपत्ती ४०० मिलियन डॉलर  बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चनला आज कोण नाही ओळखत. जंजीर आणि दीवारसारखे सुपरहिट चित्रपटानंतर अमिताभ बच्चन ‘अ‍ॅँग्री एंग मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म प्रसिद्ध कवि व लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या घरी ११ आॅक्टोबर, १९४२ ला अलाहाबादमध्ये झाला होता. त्यांची एकूण संपत्ती ४००मिलियन डॉलर आहे.  १. शाहरुख खान* एकूण संपत्ती ४ हजार करोडशाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला नवी दिल्लीमध्ये झाला होता. १९८० मध्ये टिवी सीरियलद्वारे शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तर १९९२ मध्ये ‘दीवाना’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, चक दे इंडिया, कभी खुशी कभी गम, रब ने बना दी जोड़ी आदी त्याचे प्रसिद्ध चित्रपट असून शाहरुख भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे ४ हजार करोड आहे, असे सांगितले जाते.