Video : ‘पद्मावत’चे पडद्यावर न दिसलेले ‘नैनो वाले ने’ हे गाणे आत्ता कुठे झाले रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 9:00 AM
नीति मोहनने गायलेले ‘नैनो वाले ने’ हे गाणे लोकांच्या ओठांवर होते. पण ‘पद्मावत’ पडद्यावर आला तेव्हा ‘नैनो वाले ने’ हे गाणे कुठेही नव्हते.
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा यंदाचा सर्वात मोठा सुपरहिट सिनेमा म्हणजे ‘पद्मावत’. सुरूवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाने रिलीजनंतर बॉक्सआॅफिसवर ५०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. राणी पद्मावतीच्या ‘जौहर’ कथेवर आधारित या चित्रपटात दीपिका पादुकोण राणी पद्मावतीची मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. रणवीर सिंग अलाऊद्दीन खिल्जीच्या तर शाहिद कपूर राजा रावल सिंगच्या भूमिकेत दिसला होता. ‘पद्मावत’मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत जीव ओतला. यासाठी जीव तोड मेहनत घेतली. भरभक्कम वजनाचे पोशाख घालून वावरण्यापासून तर नाचण्यापर्यंत असे सगळे काही या कलाकारांनी केले. रणवीर सिंगची मेहनत यात सर्वाधिक उठून दिसली.या सर्वांच्या अभिनयाचे अमाप कौतुक झाले होते. कलाकारांच्या अभिनयाशिवाय या चित्रपटातील गाणीही लोकांना आवडली होती. रिलीजआधीच चित्रपटाची दोन गाणी ‘घूमर’ आणि ‘एक तू है’ प्रचंड लोकप्रीय झालीत. खरे तर रिलीज आधी या चित्रपटाच्या चार गाण्यांचे आॅडिओ रिलीज केले गेले होते. यापैकी नीति मोहनने गायलेले ‘नैनो वाले ने’ हे गाणे लोकांच्या ओठांवर होते. पण ‘पद्मावत’ पडद्यावर आला तेव्हा ‘नैनो वाले ने’ हे गाणे कुठेही नव्हते. चित्रपटाचा अवधी कमी करण्यासाठी हे गाणे गाळण्यात आल्याचा खुलासा यादरम्यान भन्साळी प्रॉडक्शनने केला होता. पण आता रिलीजनंतर दीड महिन्यांनी या गाण्याचा व्हिडिओ रिलीज केला गेला आहे. होय, काल मंगळवारी रिलीज करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत १७ लाखांवर लोकांनी पाहिला आहे. यावरून ‘पद्मावत’बद्दलची लोकांची के्रज अद्यापही कमी झालेली नाही, असेच दिसतेय.‘नैनो वाले ने’ गाणे अतिशय शाही अंदाजात सादर करण्यात आले आहे. तुम्हीही या गाण्याचा व्हिडिओ बघा आणि तो कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.ALSO WATCH : एकदा तरी नक्कीच पाहा, रणवीर सिंगच्या ‘खली बली’ गाण्याचा ‘मेकिंग व्हिडिओ’!