Join us  

'जाने तू या जाने ना' च्या स्टारकास्टचा Video व्हायरल, १६ वर्षांनी पुन्हा सगळ्यांना पाहून चाहते भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:33 PM

जय आणि अदितीशिवाय बाकी स्टारकास्टला पाहिलंत का?

2008 साली आलेला 'जाने तू या जाने ना' (Jaane Tu Ya Jaane Na) हा प्रेम, मैत्री या विषयावरचा सिनेमा तरुणाईच्या आजही जवळचा आहे. सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. सिनेमाला १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यामध्ये इमरान खान आणि जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत गोते. इमरान खानचा तर हा डेब्यू सिनेमा होता. मामा आमीर खाननेच सिनेमाची निर्मिती केली होती. आता इतक्या वर्षांनंतर निर्मात्यांनी सिनेमाच्या कास्टचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आमिर खान प्रोडक्शन्सने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये इमरान, जिनिलियासोबतच मंजिरी फडनीस, सुगंधा, अलिश्का वर्दे सिंहत, करण मखीजा, नीरव मेहता ही इतर स्टारकास्टही 'जाने तू या जाने ना'हे आकॉनिक गाणं गुणगुणताना दिसत आहे. त्यांना पाहून चाहत्यांच्याही सिनेमाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तसंच इमरान-जिनिलियाशिवाय इतर स्टारकास्ट आज किती बदललेली दिसतेय हेही व्हिडिओतून समोर आलं आहे.

चाहत्यांनी कमेंट्समध्ये सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तसंच मंजिरी फडनीसच्या आवाजावर चाहते फिदा झालेत. जिनिलियाचा आवाज अजिबातच बदललेला नाही अशीही कमेंट एकाने केली आहे. अनेक चाहते भावूकही झाले आहेत. सिनेमा पु्न्हा रिलीज करण्याचीही काही जणांनी मागणी केली आहे. इतक्या वर्षांनंतरही 'जाने तू या जाने ना' चाहत्यांच्या मनात आहे.

टॅग्स :इमरान खानजेनेलिया डिसूजासिनेमासोशल मीडिया