Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील व्हिडिओचा सोशल मीडियावर बोलबाला, दिसला जबरदस्त स्वॅग!

By तेजल गावडे | Updated: September 21, 2020 14:22 IST

प्रियंका चोप्राच्या रेड ड्रेसमधील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर वेधून घेतले सर्वांचे लक्ष

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप उमटविली आहे. प्रियंकाने आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत यश संपादन केले आहे. सध्या प्रियंका सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती या माध्यमातून चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत अपडेट देत असते. नुकताच प्रियंकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होताना दिसतोय.

प्रियंका चोप्राने तिचा रेड ड्रेसमधील व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २२ लाखांहून जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत प्रियंका कोणत्या तरी इव्हेंटमध्ये असून यात तिने रेड रंगाचा ड्रेस परिधान केलाय आणि यात ती ड्रेसचा घेर हातात धरून फिरताना दिसते आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावला आहे.

प्रियंकाने हा व्हिडिओ शेअर करत एमीजच्या नॉमिनीजला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, आजच्या संध्याकाळसाठी सर्व नामांकन जाहीर झालेल्यांना शुभेच्छा.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतेच तिने अॅमेझॉनसोबत दोन वर्षांच्या 'मल्टीमिलियन-डॉलर फर्स्ट-लुक टेलीविजन डील'वर हस्ताक्षर केले आहेत. ही माहिती खुद्द प्रियंकाने इंस्टाग्रामवर दिली होती. यासोबतच ती लवकरच राजकुमार रावसोबत एका चित्रपटात झळकणार आहे.

शेवटची ती द स्काय इज पिंक या सिनेमात दिसली होती. यात प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित शराफ हे कलाकार होते. ती या चित्रपटाची निर्मातीदेखील होती.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रास्काय इज पिंकराजकुमार रावफरहान अख्तरझायरा वसीम